डिझेल, वीज, पाणी, औषधी गायब; छत्रपती संभाजीनगर नावाचे जणू खेडेगाव! अंबादास दानवे यांची खरमरीत पोस्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कच्च्या तेलाचे वाढलेले भाव, वाढती महागाई, वाढलेले तापमान यामुळे राज्यात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. याची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसत आहे. मराठवाड्यातील भीषण वास्तव समोर आणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अंबादास दानवे यांनी सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ट्वीट केले आहे. ‘छत्रपती संभाजीनगर नावाचे जणू खेडेगाव’ असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

आपल्या पोस्ट मध्ये अंबादास दानवे लिहितात, ‘छत्रपती संभाजीनगर नावाचे जणू खेडेगाव! छत्रपती संभाजीनगरची ताजी खबर.. पंपावरून डिझेल – गायब! घरातून वीज – गायब! नळातून पाणी – गायब! दुकानातील औषधी – गायब! “खेड्याकडे चला!” अशी घोषणा आपण ऐकत आलो. मात्र शहरातील सध्याच्या व्हिजनरी राज्यकर्त्यांना येथील लोकांना त्रास द्यायचा नव्हता बहुदा. त्यांनी थेट शहरालाच खेडं बनवून दाखवलं!

‘आता फक्त शहराच्या रस्त्यांवर वाघांची आणि हरणांची कमतरता आहे!’, असा सणसणीत टोला देखील अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

Comments are closed.