MPSC च्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत द्या, अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहीरात तब्बल सात महिने उशीरा प्रसिद्ध करण्यात आली होती. साधारणत: जानेवारी महिन्यात प्रसिद्ध होणारी ही जाहिरात यंदा २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे हजारो उमेदवारांची वयोमर्यादा उलटून जात असल्याने ते या परिक्षेस अपात्र ठरत आहेत. त्यामुळे सरकारने MPSC च्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतचे पत्र लिहले आहे.
”राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची २९ जुलै २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत वयोमर्यादा गणनेसाठी दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.त्यामुळे १ जानेवारी १९९१ ते ३१ ऑक्टोबर १९९१ दरम्यान जन्मलेले सर्व उमेदवार पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अपात्र ठरत आहेत. नेहमीप्रमाणे ही जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाली असती तर सदर उमेदवार पात्र ठरले असते. मात्र, जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिने उशीर झाल्यामुळे हजारो उमेदवारांचे PSI पदाबाबतचे शेवटचे स्वप्न धुळीस मिळणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब पदाच्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत द्यावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना दिले”, असे दानवे यांनी ट्विट केले आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची २९ जुलै २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत वयोमर्यादा गणनेसाठी दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.त्यामुळे १ जानेवारी १९९१ ते ३१ ऑक्टोबर १९९१ दरम्यान जन्मलेले सर्व उमेदवार पोलीस… pic.twitter.com/w19Wl4OANf
— अंबादास दानवे (@iambadasdanve) 29 डिसेंबर 2025

Comments are closed.