संपत्तीच्या स्पर्धेत गौतम अदानींची आघाडी, रचला नवा इतिहास, दररोज नेमकी किती आहे कमाई?
अंबानी विरुद्ध अदानी: 2026 हे वर्ष उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी फायदेशीर ठरले आहे. तर उद्योगपती मुकेश अंबानींसाठी (Mukesh Ambani) ते तोट्याचे ठरले. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या एका ताज्या अहवालानुसार, (According to the Bloomberg Billionaires Index report) गौतम अदानींनी या वर्षी दररोज सरासरी 1897 कोटी कमावले, तर मुकेश अंबानींना दररोज सरासरी 1352 कोटींचे नुकसान झाले. 1 जानेवारी ते 4 जून या कालावधीत गौतम अदानी यांच्या संपत्तीत अंदाजे 30.7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानी यांनी या वर्षात आतापर्यंत 21.9 अब्ज डॉलर्स गमावले आहेत.
अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
या प्रचंड दैनंदिन उत्पन्नामुळे, गौतम अदानींनी पुन्हा एकदा मुकेश अंबानींना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे. सध्या ते ब्लूमबर्ग इंडेक्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 19 व्या क्रमांकावर आहेत, तर मुकेश अंबानी एक स्थान घसरून 20 व्या क्रमांकावर आले आहेत.
उत्पन्नाचा स्रोत काय?
जून 2026 च्या एका ताज्या अहवालानुसार, अदानी पोर्टफोलिओचा EBITDA (ऑपरेटिंग प्रॉफिट) 94834 कोटींच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. अदानी समूहाने पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. या क्षेत्रांमधील अदानी समूहाची वार्षिक गुंतवणूक एकूण 1.53 लाख कोटी होती, जी कोणत्याही भारतीय कंपनीपेक्षा सर्वाधिक आहे. परिणामी, त्याच्या शेअर्सवरील गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ राहिला आहे आणि त्याचे बाजार भांडवल वेगाने वाढत आहे.
अंबानींना तोटा का झाला?
मुकेश अंबानींच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग रिलायन्स इंडस्ट्रीजमधून येतो, जी जगातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरण संकुल चालवते. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे अंबानी समूहाच्या व्यवसायाला फटका बसला आहे. परिणामी, परदेशी गुंतवणूकदार रिलायन्ससारख्या मोठ्या आणि निफ्टीमध्ये अग्रस्थानी असलेल्या कंपनीमधून निधी काढून घेत आहेत आणि इतर शेअर बाजारांकडे वळत आहेत, ज्यामुळे त्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे.
जर रिलायन्सच्या पेट्रोकेमिकल्स, तेल किंवा रिटेल क्षेत्राची कामगिरी एखाद्या तिमाहीत बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल, तर त्याच्या शेअरची किंमत एका दिवसात 2 ते 3 टक्क्यांनी घसरु शकते. रिलायन्सचे मोठे बाजार भांडवल पाहता, केवळ 2 टक्के घसरणीमुळेही अंबानींच्या निव्वळ संपत्तीत हजारो कोटी रुपयांची घट होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
गौतम अदानींची मोठी घोषणा, ‘या’ प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Comments are closed.