‘आंबेडकरी आई’ ग्रंथाचे शनिवारी दादरमध्ये प्रकाशन
हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेत दलित समाजातील अनेक महिलांनी मुलींना उच्चशिक्षित केले आहे. अशा निवडक अज्ञात, आदर्श 42 मातांची समाजाला ओळख करून देणाऱया ‘आंबेडकरी आई’ या ग्रंथाचे शनिवार, 28 डिसेंबरला प्रकाशन होणार आहे.
दादर ( पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात संध्याकाळी 4 वाजता हा प्रकाशन समारंभ होणार आहे. आंबेडकरी स्त्राr संघटनेने या कार्यक्रम आयोजित केला आहे. अर्थतज्ञ, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभात डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रा. डॉ. अजित मकदुम, डॉ. प्रज्ञा पवार हे प्रमुख वक्ते आहेत. ‘आंबेडकरी आई’ या ग्रंथाचे संपादन प्रा. आशालता कांबळे आणि डॉ. श्यामल गरुड यांनी केले आहे.
Comments are closed.