धक्कादायक! तब्बल सव्वाचार कोटींचं ड्रग्स जप्त, दोन जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई

अंबरनाथ क्राईम न्यूज : अंबरनाथ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल सव्वाचार कोटी रुपयांचं ड्रग्स पकडलं आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

छापा मारुन पोलिसांनी चरस जप्त केलं

अंबरनाथमध्ये चरस विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती अंबरनाथ पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा मारुन पोलिसांनी चरस जप्त केलं. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सव्वाचार कोटी आहे. यातील मुख्य आरोपी हर्षल पटेल हा गुजरातला राहणारा असून गेल्या दीड महिन्यांपासून अंबरनाथ मध्ये वास्तव्याला होता. त्याचा दुसरा साथीदार सिराजुद्दीन अहमद याला देखील पोलिसांनी अटक केली. दरम्यान यामागे एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या दोन आरोपीच्या माध्यमातून या टोळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Comments are closed.