सीरियावर अमेरिकेने केला हवाई हल्ला, आयएसआयएसचे अड्डे उद्ध्वस्त, तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूनंतर कारवाई

अमेरिकेने पुन्हा एकदा सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. पालमायरा भागात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर पेंटागॉनने जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. या हल्ल्यानंतर अमेरिकन लष्कराने 'ऑपरेशन हॉकी स्ट्राइक' सुरू केले असून, यामागचा उद्देश ISIS नेटवर्क पूर्णपणे नष्ट करणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही लष्करी कारवाई सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेचे नागरिक आणि सैनिकांवर होणारे हल्ले अमेरिका खपवून घेणार नाही आणि जगात कोठेही अमेरिकन लोकांना लक्ष्य करणाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना संपवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेचा एक भाग म्हणून मध्य सीरियातील ISISशी संबंधित सुमारे 70 लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये दहशतवाद्यांची लपण्याची ठिकाणे, शस्त्रसाठा केंद्रे आणि प्रशिक्षण तळांचा समावेश होता. पेंटागॉनने संकेत दिले आहेत की परिस्थितीनुसार आगामी काळात आणखी लष्करी कारवाई केली जाऊ शकते.
या कारवाईत अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी आपल्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन केले. F-15 ईगल फायटर जेट्स, A-10 थंडरबोल्ट ॲटॅक एअरक्राफ्ट, AH-64 अपाचे हेलिकॉप्टर आणि HIMARS रॉकेट सिस्टीमचा वापर हल्ल्यांमध्ये करण्यात आला. याशिवाय जॉर्डनच्या F-16 लढाऊ विमानांनीही या कारवाईत भाग घेतला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या लष्करी कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, हे हल्ले आयएसआयएसच्या मजबूत गडांना लक्ष्य करत आहेत. अमेरिकेवर हल्ला करण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. सीरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल-शारा यांनाही त्यांनी पाठिंबा दिला.
बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवल्यानंतर अमेरिका आणि सीरिया यांच्यातील संबंधांना नवे वळण मिळाले आहे. अलीकडेच अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शारा यांनी वॉशिंग्टनला भेट दिली आणि अमेरिकेच्या नेतृत्वाची भेट घेतली. 1946 नंतर सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हाईट हाऊसला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Comments are closed.