जो बायडन यांचा निर्णय बदलणं डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडणार? अमेरिकेवरील कर्ज वाढण्याची भीती
न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. One Big Beautiful Bill Act आणणार आहेत. या विधेयकाची चर्चा फक्त अमेरिकेत नसून संपूर्ण जगभर आहे. हे बिल अमेरिकेच्या 2017 च्या कर कपातीला कायम करण्यासाठीचा प्रयत्न आहे. हे विधेयक व्यापक स्वरुपात असून ज्यामध्ये सीमा सुरक्षा, खर्च आणि कराचा समावेश आहे.
या विधेयकामुळं काही गोष्टींमध्ये दिलासा मिळतो, त्याशिवाय काही गोष्टींमध्ये वाद निर्माण करतं. अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या इतर देशांतील लोकांना त्यांच्या देशात पैसे पाठवायचे असल्यास 5 टक्के कर आकारला जाणार आहे. नवीकरणीयक्षम ऊर्जानिर्मितीसाठी दिलं जाणारं अनुदान रद्द करणं प्रस्तावित आहे.
या विधेयकासंदर्भात काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की यामुळं अमेरिकेवरील कर्ज वाढेल. अमेरिकेवर 3.8 ट्रिलियन डॉलर कर्ज वाढू शकते. याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन 8.30 लाखांहून अधिक नोकऱ्या संपतील, अशी शक्यता आहे. याशिवाय अमेरिकेत राहणाऱ्या लोकांच्या घरासाठी आकारलं जाणारं बील देखील वाढू शकतं.
जो बायडन यांचा निर्णय बदलणार?
डोनाल्ड ट्रम्प यांचं हे बिल जो बायडन यांच्या काळातील एक आदेश रद्द करणार आहे. बायडन यांच्या निर्णयानुसार 2032 पर्यंत नव्या कारच्या विक्रीत दोन तृतीयांश वाहनं इलेक्ट्रिक असतील. नव्या विधेयकात तेल, गॅस आणि कोळसा काढण्यासाठी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या रॉयल्टीच्या दरात कपात करण्याचा प्रस्ताव आहे. जो बायडन नवीकरणीयक्षम ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी या प्रकारचा निर्णय घेत होते. आता या विधेयकामुळं रिन्यूवेबल एनर्जी सेक्टर्सवर मोठा परिणाम होणार आहे.
8.3 लाखांहून अधिक नोकऱ्या जाणार
द गार्जियनच्या रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी चिंता वर्तवली की क्लीन एनर्जीला देण्यात आलेलं प्रोत्साहन रद्द करण्याचा रिपब्लिकनचा निर्णय अमेरिकेला प्रभावित करेल. जवळपास 8 लाख 30 हजार नोकऱ्या संपतील. अमेरिकेतली घरांना होणारा वीज पुरवठा महाग होईल.
जो बायडन यांनी अमेरिकेत रिन्यूवेबल एनर्जी आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणूक वाढवण्यास प्रोत्साहन दिलं होतं. मात्र बिग ब्यूटीफुल बिल मुळं इलेक्ट्रिक कारसाठी दिलं जाणार टॅक्स क्रेडिट समाप्त होऊ शकतं. यामुळं पवनऊर्जा, सौर ऊर्जा आणि अणू ऊर्जांच्या योगदानासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन कमी होऊ शकतं. बिग ब्यूटीफुल बिलमुळं अमेरिकन नागरिकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होईल. यामुळं अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. महागाई, टॅरिफ आणि वीज याच्या वाढत्या उपयोगासह हे बील आणायला नको होतं. यामुळं अमेरिकेला नुकसान होऊ शकतं, असं जाणकारांचं मत आहे.
इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार या बदलांमुळं अमेरिकेच्या जीडीपीत 10 वर्षांच्या काळात 1 ट्रिलियन डॉलरची घसरण होऊ शकते. रिपोर्टमध्ये म्हटलंय की प्रस्तावित बिलामुळं वीजेच्या खर्चात वाढ होईल. याचा बोजा अमेरिकन नागरिकांवर पडू शकतो.
अधिक पाहा..
Comments are closed.