Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
संभाजीनगर: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य (War) परिस्थितीचे परिणाम जगभरातील देशांवर होत असून भारतातील इंधन पुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारचा संदर्भ देत गॅस पुरवठा कमी होणार नाही, मुबलक गॅस पुरवठाही असल्याचे म्हटले आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये (sambhajinagar) 5 मोठे उद्योग बंद गॅस अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅसचा तुटवडा कायम राहिल्यास उद्या मोठ्या प्रमाणात उद्योग बंद होतील. ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपनीला मोठा फटका बसू शकतो असे म्हणत CMIA म्हणजेच चेंबर ऑफ मराठवाडा अँड अॅग्रीकल्चर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहले आहे.
छत्रपती संभाजीनगर ऑटो इंडस्ट्रीला गस टंचाईचा मोठा फटका बसतोय.गॅस संपल्यामुळे 5 मोठे उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. उद्या याचा फटका मोठ्या प्रमाणात बसेल आणखी उद्योग बंद होतील. ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपनी ,स्टील कंपनीना मोठा फटका बसतोय. संभाजीनगर नगर उधोगाला रोज 250 ते 300 मेट्रिकटन गॅसची गरज आहे. गॅस पुरवठा पूर्ण बंद आहे .त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना CMIA (चेंबर ऑफ मराठवाडा अँड अॅग्रीकल्चर) संघटनेने पत्र लिहून मदतीची मागणी केली, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष उत्सव मंचर यांनी दिली.
संभाजीनगरमधील शेंद्रा, वाळूज ,चिखलठाणा येथील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत गॅस वापरला जातो, स्टील कंपनीला देखील मोठा गॅस लागतो. मात्र, गेल्या काही दिवसांत गॅसचा पुरवठा घटल्याने काही युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, एकदा हे युनिट बंद पडल्यास पुन्हा सुरू करणे खूप अडचणीचे असते. त्यामुळे, सरकारडे विनंती आहे की, आम्हाला मदत करावी, असे मोठे उद्योजक फटका बसल्यास, छोटे उद्योजक पूर्ण बंद पडतील, कृषी आणि इतर युनिट आहे जे बंद पडू शकतो…. कंपनी बंद पडल्यास त्याला सुरू करण्यास 24 ते 48 तास लागते, पण यात प्रोसेस सायकल बंद पडते… stok आहे पण ते खूप नाही ,खूप गंभीर स्तिथी आहे, आजची परिस्थिती गंभीर आहे, उद्या तर आणखी गंभीर परिणाम जाणवतील, बजाज ऑटोला पुरवठा करणाऱ्या युनिटला फटका बसणार आहे…आम्हाला विश्वास आहे सरकार मदत करेल, आम्ही मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय ,मंत्री अतुल सावेंकडून प्रयत्न केले जात आहेत.
40 ते 50 लघुउद्योगही बंद
गॅसचा तुटवडा झाल्याने संभाजीनगरमधील 40 ते 50 लघुउद्योगही बंद करण्यात आले असून पावडर कोटिंग, फोर्जिंग, केमिकल यासह इतर लघुउद्योग बंद झाले आहेत. संभाजीनगर मध्ये 4 हजार 500 लघू उद्योग आहेत, अशी माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे (मासिया) अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली.
कोणत्या कंपन्यांमध्ये होतो गॅसचा वापर
स्टील आणि इंजिनिअरिंग उद्योग
ऑटो कॉम्पोनंट्स उत्पादन
फार्मास्युटिकल कंपन्या
ब्रुअरीज आणि फूड प्रोसेसिंग
सिरॅमिक्स आणि ग्लास उद्योग
उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे बॉयलर आणि थर्मिक फ्लुइड हीटर्स
हेही वाचा
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
आणखी वाचा
Comments are closed.