युद्ध लादणाऱ्यांना अमेरिकन जनतेने नाकारले; इराणने डिवचले, ट्रम्प यांना कचऱ्याच्या डब्यात टाकतानाचा व्हिडीओ केला शेअर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत मोठा धक्का बसला. अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् या दोन्ही सभागृहांवर विरोधी बाकांवरील डेमोक्रॅटिक पक्षाने वर्चस्व मिळवले आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष अल्पमतात गेला आहे. ट्रम्प यांच्या दारूण पराभवाचा इराणमधील नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि इराणविरोधातील युद्धामुळे नाराज असलेल्या अमेरिकन मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळवून दिल्याचा दावा इराणी नेत्यांनी केला आहे.

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. अमेरिकन जनतेने युद्धाला नकार दिला आहे आणि आम्ही त्यांच्या या संदेशाचे स्वागत करतो, असे मोहम्मद बाघेर गालिबाफ म्हटले. अमेरिकन सरकारने जनतेच्या बदलाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

एआय व्हिडीओ केला शेअर

दुसरीकडे, अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर इराणच्या दूतावासाने एक एआय जनरेटेड व्हिडीओ शेअर केला आहे. यात डोनाल्ड ट्रम्प यांना कचऱ्याच्या डब्यात टाकले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Comments are closed.