पॅसिफिक कमांडमधून ‘इंडो’ शब्द हटवला!  अमेरिकेने पुन्हा हिंदुस्थानला डिवचले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फ्रान्समध्ये जी – 7 सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेची अपेक्षा आहे. परंतु या भेटीपूर्वी अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकने  इंडो- पॅसिफिक कमांडचे नाव आता बदलले आहे. या नावातून ‘इंडो’ शब्द हटवला असून त्याचे नाव ‘यूएस पॅसिफिक कमांड’ असे केले आहे. नाव बदलामुळे हिंदुस्थानचे महत्त्व कमी झाले का, अमेरिकेची इंडो पॅसिफिक रणनीती बदलली का, असे सवाल उपस्थित झाला आहे.

इंडो-पॅसिफिक कमांड ही संकल्पना हिंदुस्थान, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या क्वाड गटाशी संबंधित आहे. हा क्वाड गट चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता. हिंद महासागर आणि प्रशांत महासागर या दोन्ही क्षेत्रांच्या एकत्रित महत्त्व या नावामुळे मिळत होते. मात्र, यात बदल केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चांना उधाण आले आहे.

अमेरिकेच्या इंडो- पॅसिफिक कमांडचे अधिकार क्षेत्रात हिंदुस्थानचाही समावेश आहे. अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यापासून हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यापर्यत या कमांडचे क्षेत्र आहे. त्याद्वारे चीनच्या सैन्य हालचालींवर लक्ष ठेवणे, तैवानची सुरक्षा, समुद्री व्यापार मार्गाची सुरक्षा आदी कामे केली जातात. इंडो- पॅसिफिक कमांड या नावावर त्यांनी 7 दशकांपेक्षा जास्त काळ काम केले होते. मात्र आता हे नाव बदलण्यात आले आहे.

2018मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी कमांडचे नाव बदलून यूएस इंडो पॅसिफिक कमांड केले होते. त्यावेळी अमेरिकेने सांगितले होते की, हा बदल हिंदी महासागरातील वाढते महत्त्व आणि प्रशांत महासागरातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केला आहे. हे कमांड हिंदुस्थान-अमेरिकेदरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्याचे माध्यम बनले होते. संयुक्त सैन्य अभ्यास, सागरी समन्वय, गुप्त माहितीची देवाणघेवाण, व्यापक रणनीती सहकार्य यांचा समावेश आहे

Comments are closed.