अमेरिकेच्या 3 अब्ज डॉलर्सची राखरांगोळी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युद्ध हे परवडणारे नसते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्या युद्धामुळे आला आहे. इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे अमेरिकेला तब्बल 26 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, अमेरिकेच्या सैन्य संपत्तीला झालेल्या नुकसानीमुळे 1.4 ते 2.9 अब्ज डॉलर म्हणजेच 12,600 ते 26,100 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याने अमेरिकेतील ठिकाणांना अचूक लक्ष्य केले आहे. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. पेंटागनने आता व्हाइट हाऊसकडे 200 अब्ज डॉलरच्या अतिरिक्त बजेटची मागणी केली जात आहे. इराणविरोधातील संघर्षात अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचे मोठे नुकसान झाले आहे.

अमेरिकेच्या एफ-15ई स्ट्राइक ईगल जेट्सला इराणने खाली पाडले. यातील सहा क्रू सदस्य सुखरूप बाहेर पडले, परंतु 100 मिलियन डॉलर प्रति विमान या हिशेबानुसार, अमेरिकेला नुकसान झाले. 19 मार्चला 82.5 मिलियन डॉलर किमतीचे अत्याधुनिक एफ-35ए लाइटनिंग-3 विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. यावरून इराणने दावा केला आहे की, आम्ही अचूक हल्ला केल्यामुळे अमेरिकेला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. अमेरिकेचे जॉर्डनमध्ये तैनात असलेले थाड मिसाईल डिफेन्स सिस्टमला उडवण्याचे काम इराणने केले आहे. यामुळे 300 मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड एअरक्राफ्ट कॅरियरवर अचानक आग लागली. यामुळे अनेक भागाचे मोठे नुकसान झाले. आता याला ग्रीसच्या एका बंदरावर दुरुस्तीसाठी नेण्यात आले आहे.

टँकर, ड्रोनचे नुकसान

लढाऊ विमानाला हवेत इंधन पुरवठा करणारे टँकर हवाई युद्धात कणा समजले जाते, परंतु अमेरिकेचे यातही नुकसान झाले. इराकच्या हवाई क्षेत्रात एका केसी-135 स्टँटोटँकरची हवेत जोरदार झालेल्या टक्करने अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू झाला. तसेच सौदी अरबच्या प्रिन्स सुल्तान एअर बेसवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच अन्य केसी-135 विमानांना मोठे नुकसान झाले. अमेरिकेला 165 मिलियन डॉलरच्या नव्या केसी-46 पेगासस विमानाची मदत घ्यावी लागतील.

Comments are closed.