होर्मुझ सामुद्रधुनी अद्यापही बंद; शांतता चर्चेसाठी अमेरिका, इराणचे शिष्टमंडळ स्वित्झर्लंडमध्ये दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराण यांच्यातील महत्त्वपूर्ण शांतता चर्चेसाठी दोन्ही देशांची शिष्टमंडळे स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाली आहेत. पाकिस्तान आणि कतारही मध्यस्थ म्हणून बैकीत सहभागी होणार आहेत. मात्र, ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच, इराणने अमेरिका आणि इस्रायलवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. त्यामुळे जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार पुढे नेण्यासाठी आता दोन्ही देशात चर्चा सुरू आहे. अमेरिका, इराण, पाकिस्तान आणि कतार यांची शिष्टमंडळे रविवारी स्वित्झर्लंडमधील बर्गेनस्टॉक येथे या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दाखल झाली आहेत. परंतु चर्चा सुरू होण्यापूर्वीच आखाती देशात पुन्हा तणाव वाढला आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलवर सामंजस्य कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत, होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांच्या वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद केली आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी सांगितले की, ते येत्या काही दिवसांत स्वित्झर्लंडसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे वरिष्ठ प्रतिनिधी आधीच तेथे दाखल झाले असून ते चर्चेच्या तांत्रिक बाबींवर काम करत आहेत. आतापर्यंत चर्चा योग्य दिशेने पुढे जात आहे, असे त्यांनी सांगितले.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पुष्टी केली आहे की त्यांचे शिष्टमंडळ स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहे. स्विस परराष्ट्र मंत्रालयानेही इराणी संघाच्या आगमनाचे स्वागत केले असून, ही भेट अमेरिका-इराण कराराच्या अंमलबजावणी प्रक्रियेचा एक भाग असल्याचे म्हटले आहे.

चर्चा सुरू होण्याच्या काही तास आधी, इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केली. इराणचा आरोप आहे की अमेरिका आणि इस्रायलने अलीकडील कराराच्या पहिल्या अटीचे उल्लंघन केले आहे. इराणचे म्हणणे आहे की, दक्षिण लेबनॉनमधील इस्रायलची लष्करी कारवाई आणि अमेरिकेची भूमिका कराराच्या विरोधात आहे.

Comments are closed.