इराणमध्ये खामेनी युगाचा अंत? उत्तराधिकारी जाहीर

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी आपले संभाव्य उत्तराधिकारी जाहीर केले आहेत. त्यात तीन ज्येष्ठ धर्मगुरुंचा समावेश आहे. इराण-इस्रायलमध्ये निकराचे युद्ध सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. खामेनी यांच्या उत्तराधिकाऱयांमध्ये त्यांच्या मुलाचे नाव नाही. युद्ध पेटल्यापासून खामेनी हे भूमिगत झाले आहेत. इस्रायलने इराणच्या अनेक मोठय़ा नेत्यांना लक्ष्य केल्यामुळे खामेनी यांच्या जिवाला धोका वाढला आहे.

Comments are closed.