किरण राववर शस्त्रक्रिया

बॉलीवूड अभिनेता आमीर खानची एक्स वाईफ आणि चित्रपट निर्मात्या किरण राव यांच्या अपेंडिक्सवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्जरीनंतर किरण राव यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून प्रकृती ठीक आहे, असेही किरण रावने म्हटले.

Comments are closed.