धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भाजप कार्यकर्त

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शहा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर (Resignation) राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडत असून सर्व स्थरातून आता अभिप्राय समोर येत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदा भाष्य करत अभिप्राय दिली आहे. यात त्यांनी म्हटले की, भाजप (BJP) कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, आपली तरुण पिढी आणि विद्यार्थी अधिक महत्त्वाचे आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हेच दर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. (धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शहा)

दरम्यान25 जुलै रोजी दुपारी आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, गेल्या 10 दिवसांतील घटनांमुळे त्यांना तीव्र दुःख झाले असून हा मुद्दा त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नाही. त्यांनी सांगितले की, भाजप सरकार देशातील तरुणांचा आदर करते आणि पेपरफुटीविरोधात सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहे.

Amit Shah on Dharmendra Pradhan Resignation : भाजपसाठी देश महत्त्वाचा: अमित शाह

दरम्यानगृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले च्याभाजप कार्यकर्त्यांसाठी देश, आमची तरुण पिढी आणि विद्यार्थी हे त्यांच्या पदापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिलेला आपल्या पदाचा राजीनामा हेच दर्शवतो. मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते आणि पेपरफुटीविरोधात आवश्यक सुधारणा लागू करण्यासाठी कटिबद्ध आहे. पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मोदीजींनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. मला खात्री आहे की, या पावलांमुळे नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळेल.”

Amit Shah on Dharmendra Pradhan : गृहमंत्री यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या कामगिरीचा घेतला आढावा

अमित शहा पुढे म्हणाले च्या“आपल्या कार्यकाळात धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी केलीमातृभाषेत परीक्षांची तरतूद, पीएम श्री शाळांचा विस्तार, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन, कौशल्य विकास आणि उद्योग-शैक्षणिक समन्वय मजबूत करणे यांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. परीक्षा प्रणाली अधिक सर्वसमावेशक आणि विद्यार्थी-केंद्रित बनवण्याचे त्यांचे प्रयत्नही उल्लेखनीय आहेत. त्यांचा कार्यकाळ भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाप्रती असलेली त्यांची निष्ठा दर्शवतो.”

Pralhad Joshi : प्रल्हाद जोशी यांना शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांना शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे, तर ते केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री म्हणून आपली सध्याची जबाबदारी सांभाळत राहतील. देशभरात अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनांमुळे हे मंत्रालय तीव्र सार्वजनिक आणि राजकीय छाननीखाली आले होते.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, शनिवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांमध्ये जल्लोष उसळला. आंदोलकांनी आपल्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाचे हे पहिले मोठे यश असल्याचे सांगत आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांनी सांगितले की, हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून, शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे आंदोलन केवळ राजीनाम्यापुरते मर्यादित नसून, देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सर्वसमावेशक सुधारणा होईपर्यंत आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकता येईपर्यंत ते सुरूच राहील.

आणखी वाचा

Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: केंद्र सरकार विद्यार्थ्यांपुढे झुकलं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.