बुजदिल राक्षस… पहलगाम हल्ल्यानंतर अखेर 20 दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी सोडलं मौन, कवितेतून व्यक्त केला संताप

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. देशभरातून या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची मागणी करण्यात आला. या हल्ल्यावर अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या, मात्र नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी मौन बाळगले होते. आता तब्बल 20 दिवसानंतर अमिताभ बच्चन यांनी मौन सोडले असून पहलगाम हल्ल्यासह ‘ऑपरेशन सिंदूर’वरही प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यापासून अमिताभ बच्चन यांनी एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर अनेक पोस्ट केल्या होत्या. मात्र या पोस्टमध्ये फक्त नंबर लिहिलेले होते. त्यासोबत एक शब्दही लिहिण्यात आलेला नव्हता. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानने केलेला ड्रोन-मिसाईल हल्ला यावर अमिताभ बच्चन यांनी चकार शब्दही काढला नव्हता. मात्र आता त्यांनी यावर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी बाबू जी अर्थात हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या काही ओळींचाही उल्लेख केला आहे.

Comments are closed.