अमिताभ बच्चन पुन्हा छोटय़ा पडद्यावर

मोठे बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर परत येत आहेत. लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा 17 वा सीजन 11 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकतेच यासंबंधी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले की, पुन्हा काम सुरू, सकाळी लवकर उठणे, लवकरच काम सुरू करणे, केबीसीच्या नव्या सीझनचा पहिला दिवस नेहमी तणावग्रस्त असतो. केबीसीच्या मंचावर उपस्थित दर्शक नेहमी उत्साह वाढवतात. माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. 17 व्या सीझनसाठी ‘जहां अक्ल है, वहां अकड है,’ ही टॅगलाईन आहे.

Comments are closed.