वर्गच नाही, तर शाळेतूनही मी पळून जायचो; अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट

सोनी इंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ‘कौन बनेगा करोडपती’च्या 16 व्या पर्वात अमिताभ बच्चन यांनी स्वतःसंबंधी एक मोठा गौप्यस्फोट केला. या सीजनचा एक प्रोमो समोर आला असून या शोमध्ये एक स्पर्धक अमिताभ यांना विचारतो की, तुम्ही ‘मोहब्बतें’ चित्रपटात कठोर शिस्तीच्या प्रिन्सिपलची भूमिका साकारली होती. अमिताभ यांनी परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन या त्रिसूत्रीला विशेष महत्त्व दिले होते, परंतु तुम्ही जर खरंच प्रिन्सिपल असता तर तुम्ही इतके कठोर प्रिन्सिपल असते का? तुम्ही कधी शाळेला दांडी मारलीय का? असे सवाल केले. यावर अमिताभ यांनी हसत उत्तर दिले. तुम्हाला हा विचार कुठून आला? तुम्हाला वाटतेय का मी प्रिन्सिबल बनू शकतो? खरं म्हणजे, शिक्षणात मी अगदीच ‘ढ’ होतो. त्यामुळे आयुष्यात कधीच प्रिन्सिपल बनू शकलो नसतो. परंतु, माझ्या शाळेतील मुख्याध्यापक मात्र खूपच कडक शिस्तीचे होते. मी केवळ क्लास नव्हे तर शाळेतूनही पळून जायचो, असे अमिताभ यांनी सांगितले. मी त्यावेळी नैनिताल येथील एका बोर्डिंग शाळेत शिकत होतो. आम्ही कॅम्पसच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो, परंतु रात्री सर्व झोपल्यानंतर मी गुपचूप बाहेर पडायचो. जर मला पकडले गेले तर मला शिक्षा मिळायची.

आठवड्यात मजेदार ट्विस्ट

‘कौन बनेगा करोडपती’च्या कार्यक्रमात एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यावेळी पुन्हा एकदा इंडिया चॅलेंजर वीकसोबत एक मजेदार ट्विस्ट येणार आहे. या आठवड्यात 10 प्ले अलाँग स्पर्धांपैकी फास्टेट फिंगर सर्च राऊंडच्या टॉप दोन स्पर्धकांना हॉटसीटवर जागा मिळणार आहे. लवकरच 5 बजर राऊंडमध्ये स्पर्धा करतील. यावेळी चॅलेंजचा विजेता मनी ट्रीवर सहाव्या प्रश्नापासून सुरुवात करत खेळ चालू ठेवेल.

Comments are closed.