पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री अजित पवार पांडुरंगाची शासकीय पूजा करतील; अमोल मिटकरींचं स्फो

अमोल मिटकरी अजित पवार आहे: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी सपत्नीक करावी, असं विठ्ठलाला साकडं घातल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील आरोग्यनगर भागातील निवासस्थानी रूपनाथ महाराजांची पालखी आली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी पालखीत रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडं घालतांना अजितदादांना लवकरच राज्याचे  मुख्यमंत्री करा, असे साकडे घातले. तसेच अमोल मिटकरी यांनी रूपनाथ महाराजांच्या पालखीचे सहपरिवार स्वागत केलं‌. त्यांनी त्यांच्या पत्नीसह पालखीत फुगडी देखील खेळली.

अमोल मिटकरींचं स्फोटक वक्तव्य

अमोल मिटकरी म्हणाले की, मी पांडुरंगाच्या चरणी एकदाच साकडे घातले होते. आज पालखीचे प्रस्थान होत आहे. ज्ञानोबारायांची पालखी आळंदीवरून निघाली आहे. काल तुकोबारायांची पालखी निघाली. आता आमच्या जिल्ह्यातील पालखी निघत आहेत. या पालखीची आरती करताना आम्ही एकच साकडे घातले की, यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, हे साकडे मी पांडुरंगाला घातले आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.  दरम्यान, मिटकरींच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमोल मिटकरींनी याआधीही बोलून दाखवली होती इच्छा

मागील वर्षी देखील अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा बोलून दाखवली होती. अमोल मिकटरी म्हणाले होते की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये महिलांसाठी ई -पिंक रिक्षा योजना आहे. मोफत शिक्षणाची सुविधा आहे. शेतकऱ्यांना मोफत विजबील आहे आणि सर्वात महत्वाची लाडकी बहिण योजना राबवण्यात आली आहे. याच योजनेच्या भरोशावर 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकून अजितदादा पुढच्यावर्षी मुख्यमंत्री होतील आणि बाप्पाची पूजा करतील, असे त्यांनी म्हटले होते.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

इतर महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : भरत गोगावलेंकडून रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अघोरी मंत्रतंत्राचा वापर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, ‘काल मला…’

Baramati News: माळेगाव कारखान्याच्या मतदारांच्या याद्या; रात्री 11 वाजता PDCC बँक उघडी; अजितदादांचे पीए, भरणेंचे सहकारी उपस्थित, बारामतीत आरोप प्रत्यारोपाने वातावरण तापलं

आणखी वाचा

Comments are closed.