Amol mitkari said action against suresh dhas after threat-ssa97
भाजपचे आमदार सुरेश धस हे अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करताना दिसत आहेत. याचवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार धस यांना कुणाच्या सुपारी घेऊन काम करत आहात? असा सवाल विचारला होता. यानंतर आमदार धस यांनी अमोल मिटकरी यांना वॉर्निंग दिली होती. आता मिटकरींनी धस यांच्याविरोधात थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले होते?
– Advertisement –
“सुरेश धस हे महायुतीचे आमदार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्यानं धस यांच्या पोटात पोटशूळ उठलं आहे. मात्र, संतोष देशमुख प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं सुरेश धस करत असलेले राजकारण थांबले पाहिजे. धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली? त्यांनी ही सुपारी का घेतली? हे समोर आलं पाहिजे,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं होते.
सुरेश धसांनी काय म्हटलं?
– Advertisement –
यानंतर सुरेश धस म्हणालेले की, “अमोल मिटकरी फार लहान आहेत. मिटकरींनी कुणाच्याही नादी लागावं, माझ्या लागू नये. लय महागात पडेल. मी आता एकदा ऐकून घेतो. मिटकरींनी कुठेही त्यांचं दुकान चालवावे. माझ्यावर दुकान चालवू नये, असा विनंती वडीलकीच्या नात्यानं करतो. अन्यथा तुझं अवघड होईल.”
मिटकरींचं ट्विट काय?
सुरेश धस यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर एक ट्विट करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिटकरी म्हणाले, “आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्यानं घ्यावं. महागात पडेल म्हणजे काय? यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते. गृहविभाग आणि पोलीस प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.”
Comments are closed.