व्ही.के. सिंगकडून पिंकी मालीच्या कुटूंबाला धमक्या, सगळे आमदार कोणाच्या दहशतीखाली? : अमोल मिटकरी

व्हीके सिंगवर अमोल मिटकरी : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash) मृत्यू झाला होता. यात अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माली, विदीप जाधव,  कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांच्या देखील घराचा आधार गेलाय. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पिंकी माली यांच्या आईची भेट घेतलीय माहिती आहे. पिंकी माली यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. अशातच पिंकी मालीची आई सध्या सुश्रुषा रुग्णालयात भरती असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्बेतेची विचारणा करण्यासाठी अमोल मिटकरींनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तर दुसरीकडे, अमोल मिटकरी यांनी पिंकी माळी यांच्या आई माया माली यांच्या तब्येतीबाबत आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली. व्हीएसआर कंपनीने कोणत्याही प्रकारची मदत या कुटुंबाला केलेली नाही. यावर कारवाई व्हावी, आणि अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलीय.

पिंकी माळीच्या आईला भेटयाला गेलो होतो. त्या शुश्रुष हॉस्पिटलमध्ये आहेत. पिंकी माघेतलाच्या आईला आणि कुटूंबाला वी.के.सिंहकडून धमक्या आल्याचं सांगितलं आहे. त्यांना सुरक्षा द्यावी. व्ही.के. सिंहला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्ही.के. सिंह यांची मस्ती आणि मगरुरी पाहायला मिळते आहे. जयदादा पवार सुद्धा पिंकी माघेतलाच्या आईला भेटायला जाणार आहे. अजित पवार यांच्या अपघातावर चर्चा सभागृहात व्हायला हवी होती. अल्पकालीन चर्चा घेण्यास सभापती यांनी मान्यता दिली. मात्र अजूनही चर्चा झाली नाही. कामकाजच्या दिनक्रमात नाही. मागच्या बुधवारीही चर्चा टाकण्यात आली होती. मात्र गुरुवारीती काढून टाकली. अजित पवार यांच्या अपघात वर चर्चा का होत नाहीये? अशी खंतहे आमदार अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Amol Mitkari : ‘हा’ विषय सभागृहात का घेतला नाही?

देवगिरी ते विमानतळ गेट नंबर 8, ते VSR वेंचर याचे सीसीटीव्ही नाहीत. आज मी पुन्हा एकदा सभापती यांना सभागृहात प्रश्न विचारणार आहे. का चर्चा सभागृहात होत नाही, याबद्दल माझ्या मनात शंका आहे. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांना आपण विचारलं पाहिजे की हा विषय सभागृहात का घेतला नाही? असेही आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

अमोल मिटकरी : सर्व आमदार नेमकं कोणाच्या दहशतखाली आहेत?

नेमकं कोणाच्या आणि कशाच्या दहशतखाली सगळे आमदार आहेत? का अजित पवारांच्या अपघातावर चर्चा केली जात नाहीये. व्ही.च्या सिंग यांच्या लग्नात कोण गेले? हे मला माहित नाही, त्याबद्दल रोहित पवार यावर सांगतील. जय पवार यांची आज पत्रकार परिषद होती. मात्र, ती पुढे ढकलली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे जय पवार मांडतील. कोणी माय का लाल आहे जे जय पवारला दबाव आणतील. असा कोणी प्रेशर आणेल तर आम्ही आहोत त्यांच्यासोबत. महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे. ते पुण्याला काही कामा निमित्त गेले आहे. त्यामुळे ते लवकरच पत्रकार परिषद घेतील.असेही आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.