विमानाची टेल सुस्थितीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळला? अपघाताचा फोटो शेअर करत अमोल मिटकरींचा तपास यंत्रणेवर निशाणा
बारामतीत 28 जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन झाले. या दुर्घटनेतील विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीला नेण्यात आला होता. दरम्यान, विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर आगीमुळे उच्च तापमानाचा परिणाम झाल्याने ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार असल्याची माहिती AAIB ने दिली. यावरून आमदार अमोल मिटकरी विमान अपघाताच्या चौकशीवरून राज्य सरकार आणि तपास यंत्रणांना धारेवर धरले आहे.
विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाचीटेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झाला त्या… pic.twitter.com/RelNneoBxd
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) १७ फेब्रुवारी २०२६
अमोल मिटकरी यांनी X वर अपघातातील विमानाचा फोटे शेअर केला आहे. तसेच ब्लॅक बॉक्सच्या तांत्रिक बाजू मांडत या अपघाताबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा नेहमी विमानाच्या मागील भागात म्हणजेच ‘टेल’ (शेपटी) मध्ये बसवलेला असतो. अपघाताच्या वेळी विमानाचा पुढचा भाग कितीही उद्ध्वस्त झाला, तरी अनेकदा शेपटीचा भाग सुरक्षित राहतो. या अपघातातही विमानाची टेल पूर्णपणे सुस्थितीत असून ती अजिबात जळालेली नाही, असे मिटकरी म्हणाले.
मिटकरींनी पुढे ब्लॅक बॉक्सच्या मजबुतीवर भाष्य करताना म्हटले की, हा बॉक्स अत्यंत उच्च तापमानातही सुरक्षित राहील अशा पद्धतीने तयार केलेला असतो. भीषण आगीतही तो जळून खाक होत नाही. त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. मग ब्लॅक बॉक्स कसा जळला? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता तपास यंत्रणा यावर काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजितदादांचा घातपात झाला असेल तर बदला घ्यावा लागेल, अमोल मिटकरी यांचा इशारा
Comments are closed.