नवनीत राणांचा पराभव जिव्हारी; अमरावतीत बावनकुळेंचं दमदार भाषण, पण आमदाराला लागली डुलकी
Chandrashekhar Bawankule on Navneet Rana : अमरावती महानगरपालिकेचा महापौर भाजपचा आणि महायुतीचा होणार असल्याचा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला. प्रत्येक बुथवर 10 मत मिळाले असते तरी नवनीत राणा (Navneet Rana) या खासदार झाल्या असत्या. लोकसभा निवडणुकीचा नवनीत राणा यांचा झालेला पराभव हा आपल्या जिव्हरी लागला असल्याचे बावनकुळे म्हणाले. दरम्यान, एका बाजुला चंद्रशेखर बावनकुळे यांचे दमदार भाषण सुरु असतानाच भाजप नेते आमदार संजय कुटे यांना लागली झोपेची डुलकी लागल्याचं पाहायला मिळालं. संजय कुटे यांना डुलकी लागल्याचा व्हिडिओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होत आहे.
1 कोटी मताचा फरक काढून घेण्याची शक्ती आता महविकास आघाडीमध्ये नाही
निवडणुकीमध्ये आपण जेवढे उमेदवार लढू तेवढे निवडून आणणार असल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. 1 कोटी मताचा फरक काढून घेण्याची शक्ती आता महविकास आघाडीमध्ये नाही. तुमच्या विरुद्ध काँगेस जर लढली तर त्यांचा परभव झाला समजून समजा असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महायुतीला जिंकवायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन पुढे चालावं लागेल असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. अमरावतीत भाजप पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
Chandrashekhar Bawankule : दुबार मतदार यादी ही 25 वर्षांपासून, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय… चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
आणखी वाचा
Comments are closed.