Amravati congress leader haribhau mohod son missing before wedding day
अमरावती : अमरावतीच्या राजकारणातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या मुलाचा शोध सुरू आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. (Amravati congress leader haribhau mohod son missing before wedding day)
हेही वाचा : India Pakistan : त्यांनी PoK खाली करावे, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकला भारताचा इशारा
समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेते तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोड या बेपत्ता झाला आहे. बुधवारी (14 मे) वैभव मोहोड यांचा विवाहसोहळा संपन्न होणार होता. दरम्यान, वैभव हा शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. मंगळवारी (13 मे) सकाळी सामान आणायला बाहेर जातो, असे सांगून वैभव बाहेर पडला. पण तो घरी न परतल्याने त्याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अधिकची माहिती अशी की, बेपत्ता झालेल्या वैभवने सकाळीच एटीएममधून 40 हजार रुपये काढल्याचीही माहिती समोर आली. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहेत. पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. हरिभाऊ मोडक हे काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध पदांवर कामे केली आहेत. ते जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी देखील करण्यात आली होती. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
Comments are closed.