संतापजनक! पोटफुगीवर उपचार म्हणून दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम विळ्याने तब्बल 39 चटके

अमरावती क्राइम न्यूज: अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्री गावातून अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेत पोटफुगीवर (Bloating) दहा दिवसाच्या बाळाला चक्क गरम विळ्याने तब्बल 39 चटके दिल्याचा अघोरी प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे मेळघाटात अजूनही ‘डंबा’ वर अघोरी उपचार पध्दतीचा अवलंब केला जात असल्याचे समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यात चटके देणाऱ्या वृद्धमहिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर दहा दिवसांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

बाळाची प्रकृती स्थिर, चार महिन्यापूर्वीही अशीच एक घटना

पुढे आलेल्या माहितीनुसार, बाळावर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. डब्बा दिल्याने पोटफुगी कमी होते ही अंधश्रद्धा आजही  मेळघाटात सरख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात कायम आहे. चार महिन्यापूर्वीही एका बावीस दिवसाच्या बाळाला अशाच प्रकारे पोटावर चटके दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच आता ही घटना समोर आल्याने सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परिणामी या भागात जनजागृती करून असल्या अघोरी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटनांना आळा घालण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गडचिरोलीत 7 बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त; सव्वा लाखांचा दंड

गडचिरोलीतील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या सात स्कूल व्हॅनवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 7 वाहनांवर 1 लाख 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर स्कूल व्हॅन संदर्भात मिळालेल्या तक्रारींच्या आधारे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तपासणी मोहीम राबवली. यामध्ये अनेक व्हॅनकडे आवश्यक परवाने आणि कागदपत्रे नसल्याचे आढळले. काही वाहनांमध्ये अनुमतीपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केली जात होती, तर काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर वाहनाच्या टपावर ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले.

भंडाऱ्याच्या मोहाडीत दुकान फोडणारे सीसीटीव्हीत कैद

भंडाऱ्याच्या मोहाडी येथील दोन दुकानं फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मोहाडीतील सिराज मोबाईल शॉपी आणि मोटघरे हार्डवेअरमध्ये ही चोरी करण्यात आली. सिराज मोबाईल शॉपीचं शटर तोडून दुकानात प्रवेश करून मोबाईल चोरीत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. मोहाडी पोलीस या चोरट्यांचा आता शोध घेत आहे.

हे ही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.