एका तासाला 200 रुपये, अमरावतीच्या कॅफेमध्ये तरुण तरुणींचे अश्लील चाळे; दामिनी पथकाने रंगेहात धर
अमरावती क्राइम न्यूज: अमरावती शहरात राजापेठ हद्दीत काही कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या कॅफेमध्ये बसण्यासाठी तासाला 200 रुपये आकरले जात असल्याचा प्रकार सुरु असून जोडप्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचं समोर आलं. अमरावती पोलिसांनी राजापेठ भागातील काही कॅफेवर छापेमारी केली आहे.
यावेळी कॅफेत 13 तरुण तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याचे समोर आले असून या प्रकरणी अमरावती शहर पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कारवाई करत त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आलं. या प्रकारामुळे अमरावतीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
देशभरात आता प्रमुख शहरांपासून गावागावात कॅफे कल्चर चांगलंच वाढलं आहे काम करण्यासाठी, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी तरुणाईसाठी कॅफे सोयीचे. मात्र, अमरावतीमध्ये काही कॅफे हे आंबट शौकिनांचा अड्डा झाल्याचे समोर येत आहेत.अमरावती शहरात राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही कॅफेजमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी दामिनी पथकाच्या मदतीने राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील बर्गर लॅन्ड, फ्युजन बाईट, कॅफे आणि छत्री तलाव परिसरातील निर्जनस्थळी धाडी घातल्या. या कारवाईत दामिनी पथकाला 13 युवक-युवती नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या सर्वांना पोलीस ठाण्यात आणलं. त्यांची कसून चौकशी केली आणि ओळखपत्र घेऊन नोंद घेतली. तसेच युवतींच्या आई-वडिलांना बोलावून मुलींना त्यांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे शहरातील कॅफे चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
तासाला 200 रुपयांचा दर
दामिनी पथकाने धाडी टाकलेल्या कॅफेजमध्ये तरुण तरुणींना बसण्यासाठी 200 रुपयांचे शुल्क आकरले जात होते. जोडप्यांना बसण्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली जात होती. कॅफे चालक जोडप्यांना तासानुसार केबीन उपलब्ध करून देत असल्याचं समोर आलं आहे. या केबीनमध्ये तरुण तरुणी, जोडपे लाईट बंद करून तासनतास बसतात. अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काही कॅफेजमध्ये धाड मारली. त्यावेळी 13 तरुण तरुणी नको त्या अवस्थेत सापडले.
https://www.youtube.com/watch?v=cfcgchl5zb8
आणखी वाचा
Comments are closed.