भाजपचं रवी राणांच्या युवा स्वाभिमानशी जुळलं, मॅजिक फिगरसाठी अडलं; काँग्रेसकडूनही मोर्चेबांधणी

Amravati Municipal Corporation Election 2026 अमरावती : अमरावती महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी बहुमत असलेल्या भाजपसह काँग्रेसलाही मित्रपक्षांचा आधार घावा लागणार आहे. या स्पर्धेच्या आणि महापालिकेच्या चाव्या आपल्या पक्षाला मिळाव्या यासाठी हालचालींना मोठा वेग आला आहे. एकीकडे अमरावतीकरांनी भाजपच्या बाजुने स्पष्टपणे जनादेश दिलेला नाही. भाजपचे अवघे 25 नगरसेवक निवडून आले असून त्या खालोखाल युवा स्वाभिमान पक्षाचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा 15 जागांवर मुसंडी मारली असून MIM ने देखील 12 ठिकाणी दमदार कामगिरी करत एकंदरीत अमरावतीचे सत्ताकारण बदलवलंय. त्यामुळे आकड्यांची जुळवा-जवळकरत महापालिकेवर कुणाची सत्ता? येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Amravati Election Result 2026)

मिळालेल्या माहितीनुसारभाजप सध्या युवा स्वाभिमान सोबत जाणार, असं चित्र असलं तरी मॅजिक फिगर 44 आहे. भाजप 25 आणि युवा स्वाभिमान 15 असे मिळून 40 जागाच होताय. त्यामुळे सत्तास्थापणेला अजून 4 जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे बसपाच्या तीन जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे बसपा सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा हालचाली सुरू केल्याअसून काँग्रेस मित्रपक्षांना सोबत घेऊन महापौर बसवण्याचा तयारीत आहे. काँग्रेस 15 जागेवर विजयी झाला तर राष्ट्रवादी युवा स्वाभिमानमुळे भाजप सोबत जायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला, MIM ला आणि बसपा, उबाठा, वंचित आणि शिवसेना नेते अडसूळ जे राणाच्या विरोधात आहे त्यांना सोबत घेऊ शकते. एकंदरीत राजकीय समीकरण पाहता कोणाचं सूत्यामुळे जुळतं, आणि अमरावती महापालिकेत कोणाचा महापौर बसलेला होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमरावती महापालिकेचं राजकीय समीकरण (अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल 2026)

काँग्रेस – 15

एमआयएम – 12

राष्ट्रवादी – 11

शिवसेना – 3

शिवसेना उबाठा – 2

बसपा – ३

वंचित – 1

एकूण — 47

जिथे युवा स्वाभिमान पार्टी आहे तिथे आम्ही सोबत नाही : संजय खोडके (Sanjay Khodke on Ravi Rana)

दुसरीकडेजिथे युवा स्वाभिमान पार्टी आहे तिथे आम्ही सोबत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी घेतलीय. निकालाची प्रक्रिया सुरू असतानाच स्थानिक स्तरावर कुणाशीही चर्चा करू नका, असे निर्देश पार्टीकडून आले आहेत. मात्र, भाजपासोबत चर्चा करत असाल तर स्थानिक स्तरावर युवा स्वाभिमान पार्टीसोबत आम्ही सत्तेत राहणार नाही, असा निरोप आम्ही वरिष्ठांना कळवला आहे. जिथे युवा स्वाभिमान सोबत भारतीय जनता पार्टी राहील तिथे आम्ही सोबत राहणार नाही, हे मी मागील एक वर्षापासून सांगत आहे.

मुस्लिम समाजामध्ये आम्हाला अपेक्षेप्रमाणे यश, प्रतिसाद मिळाला नाही. ज्या आमच्या चांगल्या जागा होत्या तेथील मुस्लिम समाजाचं मतदान देखील काँग्रेसच्या बाजूने गेलंहे. काही भागात काँग्रेसपेक्षा आमची परिस्थिती चांगली होती. म्हणून ओवेसींनी आम्हाला टार्गेट केलं आणि त्याचा फटका आम्हाला बसला. असेही आमदार संजय खोडके म्हणाले. भाजपने देखील, आम्ही मुस्लिम महापौर बसवणार, असा प्रचार केला. त्यामुळे त्याचा फटका देखील आम्हाला बसला असल्याचेहे ते म्हणाले.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.