वय ८५, चालताही येत नाही, पण ३४ वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा अखेर मिळालीच…शेवटचा काळ आता तुरुंगात
वयाची ८५ वर्षे ओलांडलेला एक वृद्ध… चालण्यासाठीही दोन माणसांचा आधार लागणारी अवस्था… न्यायालयाच्या आवारात पाऊल टाकतानाही ज्याला कष्ट होत होते, त्या वृद्धाला न्यायालयाने थेट कारावासाची शिक्षा सुनावली आणि उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. कारण हा निर्णय एखाद्या ताज्या गुन्ह्याचा नव्हता, तर तब्बल ३४ वर्षांपूर्वी घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणाचा होता. बिहारमधील वैशाली जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निकालाने पुन्हा एकदा कायद्याचे हात कितीही लांब असतात आणि ते गुन्हेगारापर्यंत पोहोचतात हे सिद्ध करून दाखवले.
घटनेची पार्श्वभूमी
घटना १० नोव्हेंबर १९९२ ची. जुरावनपूर गावातील अवालत राय आणि त्यांची पत्नी घराबाहेर बसले होते. त्याचवेळी शेजारील कुटुंबातील काही जण त्यांच्या घरासमोर काचेचे तुकडे टाकत होते. क्षुल्लक वाटणाऱ्या या प्रकारावरून वाद निर्माण झाला आणि काही क्षणांतच परिस्थिती हिंसक बनली. आरोप आहे की, संतापलेल्या आरोपींनी थेट दांपत्यावर हल्ला चढवला. एवढ्यावरच न थांबता गोळीबारही करण्यात आला. गोळ्या लागल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांचा जीव वाचला; मात्र या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला.
नऊ आरोपी, पण काळाने घेतले चौघांचे बळी
या प्रकरणात पोलिसांनी एकाच कुटुंबातील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मार्च १९९३ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. १९९९ मध्ये आरोपींविरोधात आरोप निश्चित झाले आणि त्यानंतर सुनावणीचा प्रदीर्घ प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात चार आरोपींचा मृत्यू झाला. अनेक साक्षी, पुरावे, युक्तिवाद आणि तारखांच्या फेऱ्यांनंतर अखेर न्यायालयाने उर्वरित आरोपींविरोधात निर्णय दिला.
85 वर्षीय दीप राय दोषी आणि शिक्षण
८५ वर्षीय दीप राय दोषी अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांच्या न्यायालयाने वीप राय उर्फ जीसा राय याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवून तीन वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्याच्यासह जगदीश राय, नागेवव राय, नरेश राय आणि नाकेश्वर राय या दोषींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. इतर चार दोषींना प्रत्येकी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र वीप राय यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.
या खटल्याला तब्बल तीन दशके उलटली. अनेक आरोपी मृत्युमुखी पडले, साक्षीदारांचे आयुष्य बदलले, परिस्थिती बदलली; पण न्यायालयीन प्रक्रियेने अखेर गुन्ह्याचा शेवट गाठला. वैशाली न्यायालयाचा हा निर्णय केवळ एका गुन्ह्याचा निकाल नाही, तर हे सिद्ध झाले की आहे. गुन्हा कितीही जुना असो, काळ कितीही लोटला असो, न्यायव्यवस्था त्याचा माग काढतेच. वय, वेळ किंवा परिस्थिती गुन्ह्याची जबाबदारी मिटवू शकत नाही. ३४ वर्षांनंतर सुनावलेला हा निकाल आज बिहारमध्येच नव्हे, तर देशभर चर्चेचा विषय ठरला आहे.
Comments are closed.