एअर इंडियाच्या विमानाचे कोचीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाने घेतला निर्णय
कोची : जेद्दा येथून कोझिकोड येथे जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे गुरुवारी केरळच्या कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करविण्यात आले. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे पाऊल उचलावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाचा लँडिंग गियर आणि टायर फेल झाल्याने हे लँडिंग करावे लागल्याचे एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. याचदरम्यान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाने एक वक्तव्य जारी केले आहे. जेद्दा येथून कोझिकोड येथे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसची फ्लाइट आयएक्स 398 च्या सुरक्षित इमर्जन्सी लँडिंगमध्ये यशस्वीपणे मदत करण्यात आल्याचे वक्तव्यात नमूद करण्यात आले. विमानाच्या लँडिंगनंतर झालेल्या तपासणीत टायर फुटला होता, असे आढळून आले.
Comments are closed.