मणिपूरमध्ये एक रुग्णवाहिका नदीत पडून 2 जणांचा मृत्यू झाला.

चुराचांदपूर

मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री रुग्णवाहिका नदीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मृतदेह नदीतून हस्तगत करण्यात आले आहेत. रुग्णवाहिका मोरेह येथून चुराचांदपूरच्या दिशेने परतत असताना तेजांग गावानजीक इंफाळ नदीत ती कोसळली. या दुर्घटनेत  लमलालसांग (47 वर्षे) आणि जिमी नेंग्सुआनपाउ (52 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.

Comments are closed.