वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा धडाका! 7 विकेट घेत रचला नवा इतिहास, मोडला 43 वर्षांचा विक्रम

आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप (ICC womens world cup 2025) 2025 मध्ये शनिवारी ऑस्ट्रेलियाची लेग स्पिनर अलाना किंग (Alaana king) हिने जबरदस्त कामगिरी केली. साउथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने फक्त 18 धावांत 7 विकेट्स घेतल्या आणि आपल्या फिरकीने प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं. तिच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.

या कामगिरीसोबतच अलाना किंगने वर्ल्ड कपच्या इतिहासात नवा विक्रम रचला आणि 43 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. तिच्याआधी कोणत्याही महिला गोलंदाजाने वर्ल्ड कपच्या एका सामन्यात 7 विकेट्स घेतल्या नव्हत्या.

अलानाने घेतलेल्या 7 बळींमध्ये सुने लुस, मरिजान कप्प, एनेरी डर्कसेन, क्लो ट्रायोन, सिनालो जाफ्ता, मसाबाता क्लास आणि नादिन डी क्लर्क यांचा समावेश होता. विशेष म्हणजे तिच्या 4 विकेट्स तिने एकही धाव न देता घेतल्या.

यासोबतच ती ऑस्ट्रेलियासाठी वनडे सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारी खेळाडू ठरली. तिने एलिस पेरीचा 7/22 चा विक्रम मोडला. तसेच हा तिच्या करिअरमधील दुसरा पाच विकेट्सचा हॉल असून ती हे दोनदा करणारी ऑस्ट्रेलियाची तिसरी महिला गोलंदाज बनली आहे.

Comments are closed.