मणिपूर भागात २.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

► वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) नुसार, 19 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 2:58 वाजता भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. याचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे 35 किलोमीटरवर असल्यामुळे त्याची तीव्रता फारशी जाणवली नाही.  सौम्य तीव्रतेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, परंतु लोकांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. यापूर्वी गुरुवारी म्यानमारसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवली होते. तसेच बुधवारी रात्री उशिरा तिबेटमध्ये 3.8 तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला होता.

Comments are closed.