इंग्लंडच्या खेळाडूने तोडला IPL नियम, 2 वर्षांची बंदी शक्य!

मार्च 22 पासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) हंगामापूर्वी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने दिल्ली कॅपिटल्ससोबतचा करार रद्द केला आहे. ज्यामुळे त्याला स्पर्धेत खेळण्यास 2 वर्षांची बंदी येऊ शकते. इंग्लंडच्या 26 वर्षीय हॅरी ब्रूकने आयपीएलसाठी स्वतःला अनुपलब्ध करण्याचा हा सलग दुसरा हंगाम आहे. यासाठी त्याने फ्रँचायझी आणि त्यांच्या समर्थकांची माफी मागितली.

हॅरी ब्रुकने सोशल मीडियावर लिहिले की, मी आयपीएलच्या पुढील हंगामातून बाजूला होण्याचा खूप कठीण निर्णय घेतला आहे. मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या समर्थकांची बिनशर्त माफी मागतो. इंग्लंड क्रिकेटसाठी हा खरोखरच महत्त्वाचा काळ आहे आणि मी आगामी मालिकेच्या तयारीसाठी पूर्णपणे वचनबद्ध राहू इच्छितो.’

हॅरी ब्रूक म्हणाले, ‘माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात व्यस्त कालावधीनंतर मला ताजेतवाने होण्यासाठी वेळ मिळेल. मला माहित आहे की सर्वांनाच ते समजेल असे नाही आणि मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा करत नाही, परंतु मला जे योग्य वाटते ते करावे लागेल आणि माझ्या देशासाठी खेळणे ही माझी प्राथमिकता आहे आणि माझे लक्ष त्यावर आहे.

हॅरी ब्रुकने त्याच्या आजीच्या निधनानंतर आयपीएलच्या गेल्या हंगामातून माघार घेतली. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) आयपीएलशी संबंधित नियमांनुसार, जर एखादा परदेशी खेळाडू लिलावात निवड झाल्यानंतर अयोग्य ठरला किंवा या स्पर्धेत खेळला नाही, तर त्याला दोन वर्षांसाठी आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते.

गेल्या वर्षी बीसीसीआयने संघांना शेअर केलेल्या कागदपत्रानुसार, ‘जो कोणताही खेळाडू लिलावासाठी नोंदणी करतो आणि लिलावात निवड झाल्यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वतःला अनुपलब्ध घोषित करतो त्याला आयपीएल आणि आयपीएल लिलावात दोन हंगामांसाठी भाग घेण्यास बंदी घातली जाईल.’

 

महत्वाच्या बातम्या :

भारताच्या विजयाने पाकिस्तानमध्ये निराशा, शाहिद आफ्रिदींची प्रतिक्रिया चर्चेत!

क्रिकेटर की डान्सर? श्रेयस अय्यरच्या भन्नाट स्टेप्सवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस!

आयपीएलमध्ये दारू आणि तंबाखूच्या जाहिरातीवर बंदी घाला! आरोग्य विभागाची याचिका

Comments are closed.