85 हजारांचा आयफोन अडीच लाखांवर जाणार

ऍपलचे उत्पादन हिंदुस्थानात घेऊ नका असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर ऍपल कंपनीनेही माघार घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जर ऍपलने आपला प्रकल्प हिंदुस्थान किंवा चीनमधून हलवून अमेरिकेला नेला तर आयफोनच्या किमतीत तब्बल तीन हजार डॉलरची वाढ होऊन 85 हजार रुपयांच्या किमतीचा आयफोन अडीच लाख रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

आयफोनच्या किमतीत एक हजार डॉलरहून थेट तीन हजार डॉलरपर्यंत वाढ होण्याची भीती अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे.  ऍपल तंत्र कुशल कामगारांना महिन्याला जवळपास 290 डॉलर म्हणजेच 25 हजार रुपये देते. कारखाना अमेरिकेला गेल्यास कामगारांच्या पगारात 2900 डॉलर म्हणजेच जवळपास अडीच लाख रुपयांची वाढ होईल.

Comments are closed.