IPL मधून बाहेर पडणार संजू सॅमसन? दुखापतीबद्दल अपडेट समोर
भारतीय फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार ‘संजू सॅमसन’च्या (Sanju Samson) बोटावर मंगळवारी (12 फेब्रुवारी) शस्त्रक्रिया झाली. दरम्यान आयपीएलपूर्वी तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. सॅमसनला बरे होण्यासाठी 1 महिना लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला आयपीएलची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
अलिकडेच भारत विरूद्ध इंग्लड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. दरम्यान पाचव्या टी20 सामन्यात जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) चेंडू सॅमसनच्या बोटाला लागल्याने सॅमसनला ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे ध्रुव जुरेलने सॅमसनच्या जागी यष्टीरक्षकाची भूमिका बजावली.
या दुखापतीमुळे, सॅमसन (8 फेब्रुवारी) पासून सुरू झालेल्या केरळ आणि जम्मू आणि काश्मीर यांच्यातील रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळू शकला नाही. सॅमसनसाठी टी-20 मालिका चांगली राहिली नाही आणि तो 5 सामन्यांमध्ये 10.20च्या सरासरीने आणि 118.60च्या स्ट्राईक रेटने फक्त 51 धावा करू शकला.
आगामी आयपीएलमध्ये सॅमसन राजस्थान राॅयल्सचे (Rajasthan Royals) कर्णधारपद भूषवणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, आरआरने शेवटच्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता परंतु, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) त्यांना पराभव पत्करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG: टीम इंडियाचा दणदणीत विजय, इंग्लंडचा व्हाईट वाॅश, गिल-विराट चमकले
विराट कोहलीची मोठी कमाल! अर्धशतक झळकावून सचिनचे 2 विक्रम मोडले
शाहीन आफ्रिदीला राग अनावर, दक्षिण आफ्रिकेच्या युवा फलंदाजाला अंगावर धावून दिली धमकी! VIDEO
Comments are closed.