लग्न न करता अनायाला व्हायचंय आई… एका रील व्हिडीओतून दिली कबूली

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलाने शस्त्रक्रिया करून अनाया बांगर हे नाव धारण केले. अनया तेव्हापासून सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती रोज नवीन नवीन व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. आत्तापर्यंत तिने या व्हिडीओमधून आर्यन ते अनायाचा प्रवास शेअर केला आहे. तसेच आयुष्यातील इतरही गोष्टींचा खुलासा केलाय.
अनया बांगरने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आई होण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या एका मैत्रिणीसोबत एक गेम खेळताना दिसत आहे. यात तिने काही विचित्र प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
अनायाच्या मैत्रिणीने विचारले, ‘मुलांशिवाय लग्न की लग्नाशिवाय मुले.’ या प्रश्नाचे उत्तर देताना अनायाने लग्नाशिवाय मुले हा पर्याय निवडला. तिचा दुसरा प्रश्न असा होती की, ‘तू तुझ्यापेक्षा लहान असलेल्या एखाद्याला डेट करशील का?’, तेव्हा तिने उत्तर दिले, ‘नाही. म्हणजे अनायाला तिच्य़ापेक्षा लहान कोणी जोडीदार म्हणून नको आहे.
तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांनी अनायाला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.
Comments are closed.