मोखा वादळाचा तडाखा, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? – TMarathiNews

मोखा वादळाचा महाराष्ट्रावर परिणाम : महाराष्ट्रातील काही भागात आज दिवसभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही काळ उन्हाच्या झळांपासून उसंत मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आग्नेय बंगालचा उपसागर सोबतच लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी (10 मे) चक्री वादळात बदलू शकते. भारतीय हवामान विभाग (IMD) ने मंगळवारी (9 मे) सांगितले की चक्रीवादळ 12 मे रोजी सकाळपर्यंत आधी उत्तर-वायव्य दिशेने आणि त्यानंतर बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे वळण्याची शक्यता आहे.

हवामानातील या बदलानंतर हवामान विभागाने मच्छीमार आणि लहान जहाजे, बोटी आणि मासेमारी नौकांच्या चालकांना मंगळवारपासून आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात न जाण्याचा इशारा दिला आहे. बदलत्या हवामानाच अंदाज आल्यानंतर. बदलत्या हवामानाच अंदाज आल्यानंतर हवामान खात्याने पूर्व-मध्य उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्रात उपस्थित असलेल्या लोकांना सकाळीच समुद्रातून परत येण्यास सांगितले आहे,

उत्तर अंदमान समुद्रातील मच्छीमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आग्नेय बंगालचा उपसागर आणि बंगाल आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ;आणि यानंतर 10 मे रोजी आग्नेय बंगालच्या उपसागरात.” पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या लगतच्या भागात चक्रीवादळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पाऊस

बदलत्या हवामानाच्या स्थितीमुळे येत्या काही दिवसांत बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरू होऊ शकतात. यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ”मोखा असे नाव देण्यात आले आहे. हवामान खात्याने सांगितले की, मंगळवार ते गुरुवार या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटांमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्रिपुरा आणि मिझोराममध्ये 13 आणि 14 मे रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागालॅंड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये 14 मे रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील 24 तासात महाराष्ट्रावर होणार असा परिणाम

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामध्ये मंगळवारी 38.5 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. दक्षिण बंगालमधील जिल्ह्यातील तापमान 38-40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले. एकीकडे चक्रीवादळाचे ढग घोंगावत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

Comments are closed.