आंध्र मद्य घोटाळ्यातील आरोपी प्रणयला अटक
अमरावती :
आंध्रप्रदेश पोलिसांनी वायएसआर काँग्रेसच्या शासनकाळात झालेल्या 3,500 कोटी रुपयांच्या मद्य घोटाळ्याचा आरोपी प्रणय प्रकाशला अटक केली आहे. प्रणयला आता आंध्रप्रदेशात आणले जात आहे. प्रणयला भारत-नेपाळ सीमेवर ताब्यात घेण्यात आले होते. प्रणय हा तेथून दुबईत पलायन करण्याच्या तयारीत होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.
Comments are closed.