Anil Parab objected to Neelam Gorhe sitting in the Speaker chair despite a no-confidence motion


गेल्या तीन दिवसांपासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी न होणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत हजेरी लावली आणि सभापतींच्या गैरहजेरीत त्यांच्या खुर्चीवर बसल्या. नीलम गोऱ्हे यांच्या या कृतीवर शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अनिल परब यांनी आक्षेप घेतला. अविश्वास ठरावाबाबत काय नियम आहेत? हे मला सचिवालयाला विचारायचं आहे, असे त्यांनी म्हटले.

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विरोधकांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दिली आहे. विरोधकांकडून अविश्वासाचा प्रस्ताव विधीमंडळ सचिवांकडे सादर करण्यात आला आहे. यानंतर गेल्या तीन दिवसांपासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी न होणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत हजेरी लावली आणि सभापतींच्या गैरहजेरीत त्यांच्या खुर्चीवर बसल्या. नीलम गोऱ्हे यांच्या या कृतीवर शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अनिल परब यांनी आक्षेप घेतला. अविश्वास ठरावाबाबत काय नियम आहेत? हे मला सचिवालयाला विचारायचं आहे, असे त्यांनी म्हटले. (Anil Parab objected to Neelam Gorhe sitting in the Speaker chair despite a no-confidence motion)

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अनुपस्थितीत नीलम गोऱ्हे त्यांच्या खुर्चीवर बसल्या. यानंतर अनिल परब म्हणाले की, आपल्या विरोधात अविश्वास ठराव आहे. नैतिकतेला धरून आपण या खुर्चीवर बसणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. कारण सकाळी सभागृहात आल्यावर आपण सभापती खुर्चीवर न बसता सभागृहात बसला होता. कदाचित आपण नैतिकतेला धरून अविश्वास ठरावावर निर्णय होत नाही तोपर्यंत सभापतींच्या खुर्चीवर बसणार नाहीत, असं आम्हाला वाटलं होतं. परंतु आता आपण खुर्चीवर बसला आहात. मला सचिवालयाला विचारायचं आहे की, अविश्वास ठरावाबाबत नेमके काय नियम आहेत? घटनापीठाच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला तर त्याला पदावर बसता येत नाही, असा नियम असावा. यावर सचिवालयाने खुलासा करावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. यावर नीलम गोऱ्हे यांनी त्यांना उत्तर दिले.

हेही वाचा – Eknath Khadse : शाळांसाठी पैसे नाहीत, मग कशाच्या जोरावर घोषणा जाहीर करता? खडसे संतापले

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, अनिल परब तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. या आधीही तुमच्याकडून अनेकवेळेला वेगवेगळ्या व्यक्तींवर आणि वेगवेगळ्या पदांवरील लोकांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. पण कायद्यात एक तत्व आहे “नॉट बिफोर मी” याचा अर्थ माझ्याच संदर्भात असलेल्या विषयावर मी भाष्य करणं योग्य नाही आणि हेसुद्धा तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे दिवसभर तुम्ही माझी येण्याची वाट बघिलीत काही हरकत नाही, पण सभापतींचं लक्ष सभागृहाकडे आणि इथल्या कामकाजाकडे आहे. आम्ही त्यांना अवगत करून देऊ आणि आपल्याला योग्य त्यावेळी यासंदर्भातलं अगदी समाधानकारक उत्तर मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वेळच्या अविश्वास ठरावाच्या मधुर आठवणी माझ्या लक्षात

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, गेल्या वेळच्या अविश्वास ठरावाच्या मधुर आठवणी माझ्या लक्षात आहेत. त्याही वेळेला रुलिंग दिलं होतं की, अविश्वास ठराव जरी दाखल झाला तरी त्याच्या दैनंदिन कामकाजात सभापती किंवा उपसभापती भाग घेऊ शकतात, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. यावर अनिल परब यांनी त्यांना आठवण करून दिली की, मागच्या वेळी अविश्वासाचा ठराव नव्हता, तो अपात्रेतचा ठराव होता. अनिल परब यांच्या या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, तेव्हा एक अविश्वासाचा ठराव सुरू होता, तो मागे घेतला गेला.

हेही वाचा – Ambadas Danve : मोहित कंबोज राज्याचा जलसंपदा विभाग चालवतात, दानवेंचा सभागृहात दावा



Source link

Comments are closed.