संजय राठोड, जयकुमार गोरेंपासून किरीट सोमय्यांच्या बायकोचे आत्महत्येचे प्रयत्न; अनिल परब यांनी सारंच काढलं, सत्ताधाऱ्यांना धू धू धुतलं

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत आज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. किरीट सोमय्या, जयकुमार गोरे आणि संजय राठोड यांच्या प्रकरणाचं काय झालं? असे एकामागून एक सवाल करत सत्ताधाऱ्यांची बोलतीच बंद केली. आदित्य ठाकरे यांची केस ही कोर्टात गेले पाच वर्षांपासून सुरू आहे. याच्यामध्ये सीबीआय चौकशी झाली. सीआयडी चौकशी झाली. परत एसआयटी चौकशी झाली. एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट कुठे गेला? दीड वर्षात सभागृहात का मांडला नाही? रिपोर्ट का दिला नाही म्हणून एसआयटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. मग तुम्ही फक्त शिळ्या कढीला उत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावे म्हणून हे आणता काय? असा हल्लाबोल करत अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
औरंगजेबची कबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काल पूर्ण चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही. आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही. या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय म्हणतात? की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता पण या प्रकरणावर एका सामाजिक कार्यकर्त्याच्या याचिकेवरून कोर्टात सुनावणी सुरू आहे. 17 फेब्रुवारीला त्याची सुनावणी फायनल होणार होती. त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची तारीख दिली. कालची जी याचिका झाली आहे ही त्या याचिकेला टॅप करणारी अशी याचिका आहे. कॉपी पेस्ट पिटीशन आहे. हे कोण करतंय, हे न कळण्या इतके आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्ट देईल ना काय निर्णय द्यायचा ते. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आणि हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये येतं? का तुम्हाला माहिती नाही? तुम्ही पेपर वाचत नाही? आम्ही सभासद काही पेपर वाचत नाही? आम्हाला काही माहित नाही? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो, ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहित नसते. बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं. सभापती महोदय तुम्ही देखील हे सर्व मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, असा संताप अनिल परब यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरेंवर ज्यांनी आज प्रस्ताव आणला आहे, त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो, त्यावेळचं. डॉ. मनिषा कायंदे यांचं ट्विट आहे. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं… हे संपूर्ण ट्विट वाचून दाखवत अनिल परब यांनी हल्ला चढवला. मनिषा कायंदेंनी सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. आता उपसभापतीच्या खुर्चीवरती लक्ष आहे. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे आहेत, असा जोरदार टोला अनिल परब यांनी लगावला.
आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल तर त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट प्रसिद्ध करा आणि कारवाई करा. संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस याच्यावरती तोंड उघडा ना? जयकुमार गोरेचे एवढे उघडे नागडे फोटो सभागृहात आले. त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. जयकुमार गोरेचा राजीनामा घ्या ना? त्याच्या राजीनाम्याची मागणी करत नाही. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही झाला. संजय राठोडचा राजीनामा नाही झाला. का फक्त विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा. तुमचं सगळं अपयश लपावं म्हणून तुम्ही करता? किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती. त्याचे व्हिडिओ दिले, त्याची चौकशी का नाही झाली? असा प्रश्नांचा भडीमार करत अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.
Comments are closed.