अबरार अहमदला संघात घेताच अनिरुद्धाचार्य संतापले, म्हणाले, काव्या मारनने दिलेल्या पैशांनी….
काव्या मारन अबरार अहमद द हंड्रेड लीगवर अनिरुद्धाचार्य : इंग्लंडमधील फ्रँचायझी लीग द हंड्रेड (The Hundred Leauge) मध्ये पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला (Abrar Ahmed) भारतीय मालकीच्या सनराइजर्स लीड्स (sunrisers leeds) संघाने विकत घेतल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. आयपीएल फ्रँचायझी सनराइजर्स हैदराबाद समूहाशी संबंधित असलेल्या या संघाने लिलावात अबरारला 1.90 लाख पाउंड (सुमारे 2.3 कोटी रुपये) मोजून आपल्या ताफ्यात सामील केले. भारत-पाकिस्तान संबंध दीर्घकाळापासून तणावपूर्ण असताना भारतीय मालकीच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूला घेतल्यामुळे अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
इंदूर, मध्य प्रदेश: द हंड्रेड लीगमध्ये काव्या मारनच्या सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदची निवड केल्याबद्दल कथा वाचक अनिरुद्धाचार्य म्हणतात, “भारतीय क्रिकेटपटू विकत घेतले पाहिजेत. भारताचा पैसा भारतातच राहिला पाहिजे. आता त्याच पैशाने पाकिस्तान गोळीबार करेल… pic.twitter.com/U5ibpIcqh4
— IANS (@ians_india) 13 मार्च 2026
विशेष म्हणजे, यापूर्वी भारतीय मालकी असलेल्या कोणत्याही संघाने पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करणार नाहीत, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र सनराइजर्स लीड्स हा निर्णय घेणारा पहिला संघ ठरला. त्यामुळे सोशल मीडियावर संघाच्या मालकीण काव्या मारनवर (Kavya Maran) टीकेची झोड उठली असून काही जणांनी संघाचा बहिष्कार घालण्याची मागणीही केली आहे.
अनिरुद्धाचार्य काय म्हणाले?
या प्रकरणावर प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य (Aniruddhacharya) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी खेळाडूला संघात घेण्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, भारतीय खेळाडूंनाच प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल. देशाला आत्मनिर्भर बनवणे आवश्यक आहे. काही लोकांना पाकिस्तानबद्दल इतके प्रेम का आहे, हे समजत नाही. आपण देत असलेले हेच पैसे उद्या पाकिस्तान भारतावर क्षेपणास्त्रे डागण्यासाठी वापरेल,” असे त्यांनी म्हटले.
फ्रँचायझीचे अधिकृत एक्स अकाउंट सस्पेंड
दरम्यान, अबरार अहमदला संघात घेतल्याच्या काही तासांतच सनराइजर्स लीड्सचे अधिकृत X (ट्विटर) अकाउंट सस्पेंड झाल्याचेही समोर आले. हे अकाउंट उघडण्याचा प्रयत्न केल्यास “Account suspended” असा संदेश दिसत आहे.
लिलावात काव्या मारन आणि डॅनियल व्हिटोरी उपस्थित
द हंड्रेड पुरुष खेळाडूंच्या लिलावावेळी संघाच्या मालकीण काव्या मारन आणि मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी लिलाव टेबलवर एकत्र दिसले. व्हिटोरी यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील काही खेळाडूंच्या सल्ल्यानंतर अबरार अहमदला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संघात पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायचे की नाही याबाबत फ्रँचायझीमध्ये कोणतीही औपचारिक बैठक झालेली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.