अनिश शेंडगे यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून स्वागत

‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धनगर समाजातील आघाडीचे कार्यकर्ते व मुलुंड येथील समाजसेवक अनिश शेंडगे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शेंडगे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, परिस्थिती चांगली असते तेव्हा सर्वच येत असतात, पण लढण्याची वेळ असते तेव्हा कुणी येत नाही. अनिश हे लढण्याच्या वेळेत शिवसेनेत आले आहेत आणि योग्य पक्षात आले आहेत, असे याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले. अनिश यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत स्वागत केले.

उद्धव ठाकरे यांचे कार्य आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेनेसाठी धडपड पाहूनच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे सांगतानाच, यापुढे धनगर सेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेनेसाठी काम करू, अशी ग्वाही यावेळी अनिश शेंडगे यांनी यावेळी दिली. शेंडगे यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना धनगर समाजाची पारंपरिक काठी आणि घोंगडे भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी ‘येळकोट येळकोट…जय मल्हार’ अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी शिवसेना नेते व पक्षाचे सचिव विनायक राऊत आदी उपस्थित होते.

Comments are closed.