अनिता अडवाणींचा दावा फोल, राजेश खन्नांसोबतचे नाते लग्न मानण्यास कोर्टाचा नकार
दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या सोबतच्या नात्याला वैवाहिक म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी करणाऱ्या अभिनेत्री अनिता अडवाणी यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. अनिता अडवाणी यांचे राजेश खन्ना यांच्या सोबतचे नाते कायदेशीररीत्या ‘विवाह स्वरूपातील’ मानले जाऊ शकत नाही असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने अनिता अडवाणी यांची याचिका फेटाळली.
अनिता अडवाणी यांनी राजेश खन्ना यांच्याशी संबंध असल्याचा दावा करून डिंपल कपाडिया, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करणारी फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल केली. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या ‘आशीर्वाद’ या बंगल्यातून हाकलून लावल्याचा आरोपदेखील अनिता यांनी केला होता. या प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने 2017 साली अनिता अडवाणी यांचा दावा फेटाळून लावला. याविरोधात अनिता अडवाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर आज बुधवारी शर्मिला देशमुख यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.
अनिता अडवाणी या कधीही डिंपल कपाडिया किंवा त्यांच्या कुटुंबासोबत एकाच घरात एकत्र राहिलेल्या नाहीत. यात काwटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधील प्रत्येक नाते लग्नासारखे नसते, असेही हायकोर्टाने याचिका फेटाळताना नमूद केले.
Comments are closed.