Anjali Damania sensational claim about Vaishnavi Hagavane mother-in-law Inspector General of Police Jalinder Supekar


मुंबई : सासरच्या जाचाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी आता राजकारण तापताना दिसत आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वैष्णवी हगवणेच्या नवऱ्याचे मामा पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. (Anjali Damania sensational claim about Vaishnavi Hagavane mother-in-law Inspector General of Police Jalinder Supekar)

वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर अंजली दमानिया यांनी अनेक ट्वीट करताना गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांनी म्हटले की, जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक असून ते वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. त्यांच्याबद्दल मी माहिती घेतली असून हगवणे कुटुंबीय या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनांवर अत्याचार करायचे. जालिंदर सुपेकर यांच्यावर 500 कोटींच्या घोटाल्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. एवढंच नाहीतर जळगावमध्ये पीएसआय सादरे यांनी जालिंदर सुपेकर यांनी त्रास दिल्याचे पत्र लिहून आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

हेही वाचा – Vaishnavi Hagawane Suicide Case : नीचपणाचा कळस; कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सामंतांकडून संताप व्यक्त

अंजली दमानिया म्हणाल्या की, मयुरी जगताप जी हगवणेंची मोठी सून आहे, तिने पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरवेळी देखील हगवणे कुटुंब फरार झाले होते. तेव्हा, वैष्णवीच्या नणंदेने म्हणजेच करिष्मा हगवणे हिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. फरार झालेला व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि मयुरीच्या आई आणि भावाविरुद्ध तक्रार दाखल करतो आणि पुन्हा गायब होतो. तसेच, तू आमचं काहीही बिघडू शकत नाही, आमची ओळख वरपर्यंत आहे, अशी धमकी सुद्धा देतो. त्यामुळे अशा अतिशय विकृत मानसिकता असलेल्या कुटुंबावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी म्हटले की, वैष्णवीचे सगळ्यात ज्यास्त हाल तिची नणंद म्हणजे करिश्मा हगवणे करायची. तसेच सासू लता आणि सासरे राजेंद्र हगवणे हे दोन्ही सूनांना छळायचे अशी माहिती मिळाली आहे. याशिवाय हगवणे कुटुंबाची फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणसं फरार झाली होती. त्या घरात सुनांनाच नाही तर सुशीलला देखील छळलं जायचं. त्यामुळे कुटुंबाला खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे. अंजली दमानिया यांनी वैष्णवीच्या जखमेचे फोटो शेअर करताना म्हटले की, वैष्णवीच्य अंगावरील जखमांपैकी तीन छिद्र असलेली जखम संशयास्पद वाटते आहे. वैष्णवीच्या वडिलांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Supriya Sule : ताई म्हणतात दादांचा संबंध नाही; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?





Source link

Comments are closed.