संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासासंदर्भात दमानियांची नवीन पोस्ट; म्हणाल्या.. फोटो तपासा, खात्री करा

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासा संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोंमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश याच प्रकरणात निलंबित झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. मात्र हे फोटो आधी तपासा आणि खात्री करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
X वर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन, हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. पण कोणाबरोबर? संतोष देशमुख हत्याकांडाची सूनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिस सुधिर भाजीपाले यांच्यासोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत.”, असं त्या आपल्या पोस्टमध्ये म्हटल्या आहेत.
दमानिया यांनी पुढं म्हटलं आहे की, “आरोपीला वाचणारे हे निंलबित आधिकारी यांच्यासोबत केस चालू असताना न्यायाधीश होळी खेळत असतील तर, हे खूप चुकीचे आहे.”, असंही त्या म्हटल्या आहेत. दरम्यान, अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या या फोटो आणि व्हिडीओची ‘सामना ऑनलाईन’ पुष्टी करत नाही.
केज :- हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे …..
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत
पण… pic.twitter.com/16wfqj6cnh
– श्रीमती अंजली दमानिया (@अंजली_डमानिया) मार्च 14, 2025
Comments are closed.