इंडोनेशिया पुन्हा हादरले, 6.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडोनेशियात शनिवारी सायंकाळी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.5 रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, हा भूकंप हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसार (IST) दुपारी 4.24 वाजता झाला. या भूकंपाची खोली 165 किलोमीटर होती. यात कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.

याआधी शनिवारी पहाटे इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. यात किमान 40 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. या भूकंपानंतर प्रशासनाने त्सुनामीचा इशाराही जारी केला. प्रशासनाने किनारपट्टीवरील रहिवाशांना उंच ठिकाणी जाण्याचे आवाहन केले होते, असे इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

Comments are closed.