इस्रो कडून आणखी एक कामगिरी

एससीएलसोबत मिळून 32 बिट मायक्रोप्रोसेसर विकसित

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या साराभाई अंतराळ केंद्राने सेमीकंडक्टर लेबोरेट्री, चंदीगडसोबत मिळून 32 बिट मायक्रोप्रोसेसटर विकसित करण्यास यश मिळविले आहे. हा मायक्रोप्रोसेसर विक्रम 3201 आणि कल्पना 3201 असून याचा वापर अंतराळ अॅप्लिकेशनमध्ये करण्यात येणार आहे.

विक्रम 3201 पहिला पूर्णपणे भारतात निर्मित 32-बिट मायक्रोप्रोसेसर असून जो अवघड पर्यावरणीय स्थितींमध्ये लाँच व्हीकल्समध्ये वापरण्यात येणार आहे. प्रोसेसरला एससीएलसोबत 180 एनएम (नॅनोमीटर) सीएमओएस (पूरक धातू-ऑक्साइड-अर्धचालक) सेमीकंडक्टर लॅबमध्ये तयार करण्यात आले आहे. हा प्रोसेसर स्वदेशी  स्वरुपात डिझाइन करण्यात आलेल्या 16-बिट विक्रम 1601 मायक्रोप्रोसेसरचे आधुनिक वर्जन आहे, जो 2009 पासून इस्रोच्या लाँच व्हीकल्सच्या एवियोनिक्स प्रणालीत वापरण्यात येत आहे.

कल्पना 3201 एक 32-बिट एसपीएआरसी व्ही8 (स्केलेबल प्रोसेसर आर्क्टिटेक्चर, वर्जन 8) आरआयएससी (रिड्यूस्ड इंस्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर) मायक्रोप्रोसेसर असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. इस्रोनुसार विक्रम 3201 आणि विक्रम 1601 मध्ये एक कस्टम इंस्ट्रक्शन सेट आर्क्टिटेक्चर आहे. 32 बिट मायक्रोप्रोससरच्या मदतीने लाँच व्हीकल्सच्या नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि नियंत्रणास मदत मिळते आणि या दिशेने आत्मनिर्भर होण्याकरता हे यश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचे यशस्वी परीक्षण देखील झाले आहे.

Comments are closed.