आणखी एका मोस्ट वॉन्टेड गुंडाला अमेरिकेत अटक
नोनी राणाचे लवकरच होणार प्रत्यार्पण
वृत्तसंस्था/जयपूर
मोस्ट वाँटेड गँस्टस्टर नोनी राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या यंत्रणांनी नोनी राणा हा कॅनडात पलायन करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला नियाग्रा सीमावर्ती भागातून ताब्यात घेतले आहे. सीमावर्ती क्षेत्राच्या सुरक्षा तपासणीदरम्यान तो यंत्रणांच्या जाळ्यात सापडला आहे. नोनी राणा हा मूळचा हरियाणचा रहिवासी आहे. तसेच तो कुख्यात गँगस्टर काला राणाचा कनिष्ठ बंधू आहे. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा दीर्घकाळापासून त्याचा शोध घेत होत्या. त्याच्या अटकेनंतर भारतीय यंत्रणा आता प्रत्यार्पणाची प्रक्रिया राबविणार आहेत. यापूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि अनेक प्रकरणांमध्ये वाँटेड असलेल्या अनमोन बिश्नोईला अमेरिकेतून प्रत्यार्पण करत भारतात आणले गेले होते. अनमोल अमेरिकेतून भारतात दहशतवादी सिंडिकेट चालवत होता. अनमोल बनावट पासपोर्टच्या मदतीने विदेशात पसार झाला होता. केनिया आणि अन्य देशांमधून जात तो अमेरिकेत पोहोचला होता.
Comments are closed.