दुसरा पक्ष द्रमुकपासून फारकत घेणार आहे.

विजय सरकारला गूडन्यूज : तामिळनाडूत राजकीय समीकरणे बदलणार

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपासून राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारला लवकरच आणखी एक खूशखबर मिळू शकते. तर विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकला आठवडाभरात दुसरा मोठा झटका बसू शकतो. विदुथलाई चिरूथैगल काची (व्हीसीके) पक्ष आता औपचारिक स्व्रुपात एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक आघाडीतून बाहेर पडणार आहे.

व्हीसीके प्रमुख थोल थिरुमावलवन लवकरच याची अधिकृत घोषणा करणारअ ाहेत. द्रमुकची साथ सोडून व्हीसीके आता मुख्यमंत्री आणि सुपरस्टार विजय यांचा पक्ष तमिलगा वेत्री कझगमच्या (टीव्हीके) आघाडीत सामील होणार आहे.

व्हीसीके ठरला होता किंगमेकर

विधानसभा निवडणुकीत विजय यांचा पक्ष टीव्हीकेने ऐतिहासिक कामगिरी करत 234 पैकी 108 जागा जिंकल्या होत्या. परंतु बहुमत स्वबळावर मिळविता आले नव्हते. त्यावेळी द्रमुक आघाडीत सामील  व्हीसीकेच्या 2 जागा, काँग्रेसच्या 5 आणि डाव्या पक्षांच्या समर्थनाने बहुमताचा आकडा ओलांडला होता.

द्रमुकला झटके

मुख्यमंत्री विजय यांचे सरकार स्थापन झाल्यापासून द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत फूट पडू लागली आहे. यापूर्वी काँग्रेसने अनेक वर्षांचे नाते तोडून आघाडीला रामराम ठोकला होता. त्यानंतर द्रमुकचा सर्वात जुना आणि विश्वसनीय साथीदार एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी मागील आठवड्यात द्रमुकसोबतची आघाडी तोडली होती. स्टॅलिन यांचा पक्ष पडद्याआडून एमडीएमकेला कमकुवत करण्याचा कट रचत असल्याचा आरोप वायको यांनी केला होता.

स्टॅलिन यांची साथ का सोडत आहेत?

विजय सरकार पाडविण्यासाठी द्रमुक स्वत:चा विरोधी पक्ष अण्णाद्रमुक आणि भाजपला गुप्त समर्थन देऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचमुळे सहकारी पक्ष स्टॅलिन यांची साथ सोडून विजय यांच्यासोबत जात आहेत. आता द्रमुकसोबतची आघाडी तोडण्यापूर्वी व्हीसीकेने मंगळवारी मुख्यमंत्री विजय यांनी बोलाविलेल्या बैठकीत भाग घेतला आहे.

Comments are closed.