Anti Ageing Drinks : चिरतरुण राहण्यासाठी ट्राय करा एंटी एजिंग ड्रिंक्स
प्रत्येक स्त्रीला तिच्या वयापेक्षा तरुण दिसण्याची इच्छा असते. पण, वाढत्या वयानुसार, त्याची लक्षणे त्वचेवर दिसणे साहजिक आहे. अर्थात, वृद्धत्व थांबवता येत नाही. परंतु, संतुलित आहार आणि निरोगी लाइफस्टाईलच्या मदतीने, त्याचा वेग निश्चितच कमी करता येतो. तुमच्या वयापेक्षा तरुण दिसण्यासाठी, त्वचेची योग्य ती काळजी घेण्याबरोबरच निरोगी आहार घेणेही जास्त महत्त्वाचे आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसत असतील, तुम्ही 30व्या वर्षी 40 वर्षांचे दिसत असाल किंवा तुमची त्वचा चमक आणि घट्टपणा गमावत असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करायला हवा. जर तुम्ही तुमच्या आहारात काही हेल्दी एंटी एजिंग ड्रिंक्स समाविष्ट केलेत तर तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे जास्त काळ दिसणार नाहीत.
बेरी स्मूदी
बेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे हार्मोन्स संतुलित करतात, शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतात आणि त्वचा निरोगी बनवतात. यामुळे कोलेजन वाढते आणि त्वचेची लवचिकता टिकून राहते. यासाठी बेरी, दही आणि दूध यांना ब्लेंडरमध्ये नीट एकजीव करून घ्या. यात तुम्ही मध किंवा केळेदेखील टाकू शकता.
आयर्न ग्लो शॉट
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्ही हे आयर्न ग्लो शॉट सकाळी प्यावे. बीट आणि लिंबाचा रस यापासून बनलेले हे पेय आहे. यामुळे लोहाची कमतरता दूर होते, शरीराला ताकद मिळते आणि चेहऱ्यावर चमक येते. बिटामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवतात आणि सुरकुत्या कमी करतात. हा रस त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून देखील वाचवतो.
कांजी
हे एक पारंपरिक उत्तर भारतीय पेय आहे. जे गाजर, मोहरी आणि मीठ पाण्यात मिसळून काही दिवस उन्हात ठेवून बनवले जाते. त्याची चव गोड आणि आंबट असते. या पेयामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात. गाजर अँथोसायनिन्सने समृद्ध असतात जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आहेत. हे त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते आणि त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर करते.
हे ज्यूस तुम्हाला तुमच्या वयापेक्षा तरुण दिसण्यास मदत करू शकतात. तसेच, निरोगी आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष द्या.
हेही वाचा : Vat Pournima 2025 : वटपौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये?
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.